शासकीय तंत्रनिकेतन अंबड च्या एकुण ०९ विद्यार्थ्यांची एल अॅण्ड टी या नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूवद्वारे निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्युत अभियांत्रिकीत शाखेचे ०७, यंत्र अभियांत्रिकी शाखेचा ०१ तर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या ०१ विद्यार्थांचा समावेश आहे.
एल अॅण्ड टी ही नामांकित कंपनी प्रतिवर्षी शासकीय तंत्रनिकेतन अंबड येथे कॅम्पस इंटरव्ह्यूव घेण्याकरीता येते. या इंटरव्ह्यूव व निवड प्रक्रियेचे विविध टप्पे पार केल्यानंतर कंपनी निवडक गुणवंत विद्यार्थ्याना नियुक्ती पत्र देते. आपला पदवीका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी या कंपनीमध्ये नौकरीकरीता रूजू होतात. निवड झालेल्या विद्यार्थांमध्ये श्रावन शिंदे, श्रीकांत मिसाळ, अपेक्षा मुंढे, अनिकेत धुमाळ,शेडगे पूजा, राठोड निलेश,मरकड वैभव,ओंकार दातोंडे, रोहित बादाढे यांचा समावेश आहे.
संस्थेचे प्राचार्य डाॅ.ए.एम.आगरकर यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे या दैदीप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले आहे . या कॅम्पस इंटरव्ह्यूव करीता संस्थेचे प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी श्री एन.एस.खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.ए.एम.सपकाळ, श्रीमती ए.व्ही.चेचरे,श्रीमती टी.डी.बोंबीलवार, श्रीमती एस.सी.अंबुले, श्री.व्ही.व्ही.गड्डमवार व श्री.व्ही. एम. खरमाटे यांनी विशेष प्रयत्न केले.
Comentarios